Mumbai Mayor Kishori Pednekar : जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये एकही रुग्ण ICU मध्ये नाही : किशोरी पेडणेकर
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत (Mumbai) कोरोना (Corona) रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढत आहे. परंतु, नागरिकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. कोरोना विरोधात लढण्यासाठी पालिकेची संपूर्ण तयारी झाली आहे, अशी माहिती मुंबई महालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori pednekar) यांनी दिली.
महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज बीकेसीतील कोविड सेंटरची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी किशोरी पेडणेकर म्हणाल्या, "लोकांनी घाबरून जावे अशी वक्तव्ये आम्ही पहिल्यापासूनच केलेली नाहीत. कोरोना वाढत असला तरी लोकंनी घाबरुन जावू नये. घाबरण्यापेक्षा कोरोना नियमांचे पालन करत काळजी घेतली पाहिजे. कोरोनाचं संकट गंभीर आहे परंतु, आम्ही संकटांना घाबरत नाही. खुर्चीत बसून टीका करणं सोपं असतं. प्रत्यक्ष काम करून दाखवा असं आवाहन यावेळी महापौर पेडणेकर यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांना केले.