ABP News

Mumbai Lok Sabha Elections : शिवसेना दुभंगल्यानंतरची पहिली निवडणूक, मुंबईमध्ये कुणाचा झेंडा फडकणार?

Continues below advertisement

Mumbai Lok Sabha Elections : शिवसेना दुभंगल्यानंतरची पहिली निवडणूक, मुंबईमध्ये कुणाचा झेंडा फडकणार? 

महाराष्ट्रातल्या १३ लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान पार पडतंय. यापैकी अनेक जागांवर मोठी चुरस आहे. मुंबईतल्या ३ लोकसभा मतदारसंघात शिंदेंची शिवसेना विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेत थेट लढत होणार आहे.  दक्षिण मुंबईत अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव यांच्यात लढत होतेय.  महायुतीत दक्षिण मुंबईच्या जागेचा तिढा अखेरच्या क्षणी सुटला. आधी राहुल नार्वेकरांच्या नावाची चर्चा होती. नंतर मंगलप्रभात लोढांचं नाव समोर आलं. पण अखेरच्या क्षणी शिंदेंच्या शिवसेनेकडून यामिनी जाधव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. दक्षिण मुंबईत सध्या महाविकास आघाडी आणि महायुतीची समसमान ताकद आहे. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातले ६ पैकी ३ आमदार महाविकास आघाडीचे आहेत.. तर ३ आमदार महायुतीचे आहेत. सध्या कागदावर ही लढत समसमान वाटतेय. पण उद्या मतदार कुणाच्या पारड्यात आपलं मत टाकणार हेच पाहावं लागणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram