Mumbai Lockdown: मुंबईत दररोज 20 हजारांवर रुग्ण निष्पन्न झाले तर मुंबईत लॉकडाऊन केला जाईल:आयुक्त चहल

Continues below advertisement

मुंबईत पुन्हा लॉकडाऊन करणार का? असा प्रश्न लाखो मुंबईकरांच्या मनात आहे आणि महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी त्याचं उत्तर दिलंय..... मुंबईत दररोज 20 हजारांवर रुग्ण निष्पन्न झाले तर मुंबईत लॉकडाऊन केला जाईल, असं आयुक्तांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. मुंबईत काल दिवसभरात कोरोनाचे 8 हजार रुग्ण आढळले. गेल्या काही दिवसांत मुंबईतल्या रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढतेय. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका या नव्या संकटाला तोंड देण्यासाठी सज्ज झालीय. मुंबईत सध्या ३० हजार बेड तयार असून दिवसाला दहा हजार रुग्ण नोंदवले गेले तरी त्यांच्यावर उपचार करू शकतो, असं आयुक्त म्हणाले. सध्या 80टक्के रुग्ण ओमायक्रॉनचे असून आठवडाभरात हे प्रमाण 90 टक्के होईल, असं आयुक्त चहल यांनी सांगितलं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram