Mumbai Local Thane Station : रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने ठाणे स्टेशनवर प्रवाशांचे हाल
Continues below advertisement
मुंबईत रेल्वे कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंब्रा अपघात प्रकरणी अभियंत्यांवर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी CSMT स्थानकात हे आंदोलन पुकारले, ज्यामुळे संध्याकाळच्या वेळी कामावरून घरी परतणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. या आंदोलनामुळे ठाणे स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली असून तिथे 'पाय ठेवायलाही जागा नाही', असे चित्र दिसत आहे. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे लोकल गाड्या अनेक ठिकाणी थांबवण्यात आल्या, ज्यामुळे दादर, मुलुंड आणि ठाणे सारख्या प्रमुख स्थानकांवर हजारो प्रवासी अडकून पडले. गर्दीमुळे काही ठिकाणी धावत्या लोकलमधून प्रवासी पडल्याच्या दुर्दैवी घटनाही समोर आल्या आहेत, ज्यात जीवितहानी झाल्याचे वृत्त आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement