Mumbai Local Mega Block | उद्या मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर Mega Block

उद्या उपनगरीय रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गांवर तांत्रिक देखभाल आणि रुळांच्या दुरुस्तीसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक असेल. सकाळी १० वाजून ३६ मिनिटांपासून दुपारी ३ वाजून ५१ मिनिटांपर्यंत अप धीम्या अर्धजलद लोकल कल्याण ते मुलुंड स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील. हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक घेतला जाईल. पश्चिम रेल्वेवर शनिवारी मध्यरात्री १२ वाजून १५ मिनिटांपासून रविवारी पहाटे ३ वाजून १५ मिनिटांपर्यंत मेगाब्लॉक असेल. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द होतील आणि काही उशिराने धावतील. प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी रेल्वेचे वेळापत्रक तपासावे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola