Mumbai Local Jumbo Mega Block : ठाणे स्थानकावर कसं सुरुय रुंदीकरणाचं काम?

Mumbai Local Jumbo Mega Block : ठाणे स्थानकावर कसं सुरुय रुंदीकरणाचं काम?

Thane, Mumbai Local Mega Block Updates: मुंबई : ठाणे स्थानकात (Thane Railway Station) स्थानकात 62 तासांच्या मेगाब्लॉकला (Mega Block) मध्यरात्रीपासूनच सुरूवात झाली आहे. मुंबईहून (Mumbai News) कल्याणकडे (Kalyan) जाणाऱ्या फास्ट मार्गावर 62 तासांचा, तर मुंबईकडे जाणाऱ्या स्लो मार्गावर (Mumbai Slow Local Train) 12 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेवर यामुळे वेळापत्रक कोलमडल्याचं पाहायला मिळत आहे. गाड्या 20 ते 25 मिनिटं उशिरानं धावत आहे. आज कामाचा दिवस असल्यानं ऑफिसला जाणाऱ्यांचे हाल सुरू झाले आहेत. कल्याण डोंबिवली ठाणे या प्लॅटफॉर्मवर गर्दी आहे. सकाळची कामाची वेळ, उकाडा आणि गाड्या उशिरा आल्यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत. आज मध्य आणि हार्बर मार्गावरील 161 लोकल रद्द आहेत, सध्या ठाणे स्थानकात 20 मिनिटांनी एक अशी मुंबईकडे जाणारी लोकल येत आहे. एकच ठिकाणी फास्ट आणि स्लो लोकल येत असल्यानं प्रवाशांमध्ये गोंधळ आहे, दुपारनंतर जेव्हा ठाणे स्थानकात मुंबईकडे जाणारा स्लो ट्रॅक सुरू होईल, तेव्हा यात फरक पडेल, अशी अपेक्षा व्यक्त होताना दिसत आहे. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola