Real-Life Rancho : 'तुला ती डिलिव्हरी करावी लागेल', डॉक्टर मैत्रिणीच्या सूचनेनंतर Vikas Bendre बनला हिरो

Continues below advertisement
मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये एका महिलेची प्रसूती झाल्याची एक थक्क करणारी घटना घडली आहे, ज्यात विकास बेंद्रे (Vikas Bendre) नावाच्या एका तरुणाने प्रसंगावधान दाखवत महिलेला मदत केली. 'सिचुएशन बघितल्यानंतर त्यावेळेस बाळाची सिचुएशन अशी होती की बाळ बाहेर आलं तर थोडंसं सो त्याठिकाणी दोघांचाही जीव थोडसा धोक्यामध्ये होता,' अशी प्रतिक्रिया विकास बेंद्रेने दिली. राम मंदिर रेल्वे स्थानकाजवळ धावत्या ट्रेनमध्ये महिलेला प्रसूतिवेदना सुरू झाल्यावर विकासने आपत्कालीन चेन ओढून ट्रेन थांबवली. त्याने तात्काळ आपली डॉक्टर मैत्रीण देविका देशमुख (Dr. Devika Deshmukh) हिला व्हिडिओ कॉल केला आणि तिच्या मार्गदर्शनाखाली महिलेची यशस्वी प्रसूती केली. विकासच्या या धाडसामुळे त्याला 'थ्री इडियट्स' सिनेमातील 'Rancho' म्हटले जात असून, त्याच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola