Mumbai : कोळसा टंचाईमुळे लोडशेडिंगचं संकट, बाहेरुन वीज खरेदीचा सरकारचा निर्णय : ABP Majha

Continues below advertisement

राज्यात एकीकडे विजेची वाढती मागणी आणि दुसरीकडे कोळसा टंचाई यामुळे लोडशेडिंगचं संकट निर्माण झालंय. त्यामुळे बाहेरून वीज खरेदी करण्याचा निर्णय आज राज्य सरकारनं घेतलाय. राज्यात निर्माण झालेल्या वीजसंकटामुळे राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक आज झाली. या बैठकीत वीज खरेदी करण्याच्या निर्णयाला मान्यता देण्यात आली. राज्यात लोडशेडिंग होऊ नये आणि जनतेला २४ तास वीज मिळावी यासाठी सरकारनं हा निर्णय घेतल्याचं ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram