Mumbai Legislature : माध्यम प्रतिनिधींसाठी उभारलेलं छत कोसळलं, शेड दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर
Continues below advertisement
संपूर्ण महाराष्ट्रांचं लक्ष आजपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाकडे लागलंय. राज्याच्या राजकारण १५ दिवसांत मोठे बदल झालेत. विरोधी पक्षनेते अजित पवार आता उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री झालेत. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांधील आरोप-प्रत्यारोपांची जुगलबंदी होईल का, याकडे सर्वांचं लक्ष आहे. हे अधिवेशन 4 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर सभागृहातले चित्र कसे असेल, याचीही सर्वांना उत्सुकता आहे. विधानसभेचं कामकाज सकाळी ११ वाजता सुरू होईल तर दुपारी १२ वाजता विधान परिषदेच्या कामकाजाला सुरुवात होईल. दोन्ही सभागृहामध्ये सुरुवातीला नवीन मंत्र्यांचा परिचय मुख्यमंत्री करून देतील. त्यानंतर शोकप्रस्तावाला सुरुवात होईल.
Continues below advertisement