Mumbai Kabutarkhana Row: 'तुमच्या पैशाची आम्हाला गरज नाही,आम्ही गिरगावकर संघटनेचा इशारा
Continues below advertisement
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गिरगावमधील कबूतरखान्याचा वाद पुन्हा एकदा पेटला आहे. आम्ही गिरगावकर संघटना आणि जैन समुदाय यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे. 'तुम्ही Rajasthan ला जा आणि Rajasthan ची प्रगती करा, तुमच्या कुठल्याही टॅक्सच्या आणि तुमच्या कुठल्याही पैशाची आम्हाला काढीमात्र गरज नाहीये,' अशा शब्दात आम्ही गिरगावकर संघटनेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जैन समाजाने त्यांच्या एका सभेत कोरोना काळात केलेल्या मदतीचा आणि सरकारला भरलेल्या टॅक्सचा उल्लेख केल्यानंतर हा वाद उफाळून आला. यानंतर, 'कबूतर Go Back to Marwad Rajasthan' अशा आशयाचे पोस्टर्स गिरगाव परिसरात झळकले असून, शांतिदूताच्या कबूतरांना त्यांच्या राज्यात जनकल्याणासाठी पाठवण्याची सुरुवात प्रत्येक मराठी माणसाने करावी, असे आवाहन या पोस्टर्समधून करण्यात आले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement