
Tree Plantation Inquary | फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या वृक्ष लागवडीची चौकशी होणार |
Continues below advertisement
फडणवीस सरकारच्या काळातल्या पन्नास कोटी वृक्ष लागवडीची चौकशी होणार असल्याची माहिती मिळतीय.. ठाकरे सरकारमधील काही मंत्र्यांनी शंका उपस्थित केल्यानं वनमंत्री संजय राठोड यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. मागच्या सरकारच्या माध्यमातून कोणी किती वृक्ष लावले? त्यापैकी किती वृक्ष जगले? यांची सॅटेलाइट इमेजेसच्या माध्यमातून चौकशी होणार आहे. चित्रपट अभिनेते आणि वृक्षप्रेमी सयाजी शिंदे यांनी वर्षभरापूर्वी वृक्ष लागवडीच्या चौकशीची पहिली मागणी केली होती, त्या मागणीनंतर प्रचंड खळबळ उडाली होती.
Continues below advertisement