Mumbai Housing Scamवडाळ्याच्या Sky 31 मध्ये 100 कोटींचा घोटाळा, बिल्डर Subbaraman Vilayanurवर गुन्हा
Continues below advertisement
मुंबईतील वडाळा येथील 'स्काय थर्टी वन' (Sky Thirty One) या गृहनिर्माण प्रकल्पात सुमारे 100 कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे, या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक सुब्बारमन आनंद विलयानूर (Subbaraman Anand Vilayanur) आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासानुसार, 'गुंतवणूकदारांकडून घेतलेले पैसे प्रकल्पासाठी न वापरता इतरत्र वळवण्यात आले'. या प्रकरणी कांदिवलीचे रहिवासी असलेले ६२ वर्षीय सनदी लेखापाल (CA) अनिल द्रोन (Anil Dron) यांनी केलेल्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) ही कारवाई केली. आरोपींनी २०१८ पासून १०२ खरेदीदारांकडून पैसे गोळा केले, परंतु घराचा ताबा दिला नाही. तपासात असेही समोर आले आहे की, आरोपींनी एकच फ्लॅट दोन वेगवेगळ्या व्यक्तींना विकून दोघांचीही फसवणूक केली. या प्रकरणी फसवणूक आणि गुन्हेगारी विश्वासघाताच्या कलमांखाली गुन्हा नोंदवून अधिक तपास सुरू आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement