Mumbai Hostage Crisis: रोहित आर्य एन्काऊंटर प्रकरण, संपूर्ण प्रकरणाची A to Z माहिती FULL VIDEO

Continues below advertisement
मुंबईच्या पवई (Powai) येथील स्टुडिओमध्ये १७ मुलांना ओलीस धरणाऱ्या रोहित आर्य (Rohit Arya) याचा पोलीस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला आहे. 'याला जर कोण जबाबदार असेल तर ते राज्य सरकार जबाबदार आहे', अशा शब्दांत काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. आर्य याने 'प्रोजेक्ट लेट्स चेंज' (Project Let's Change) अंतर्गत 'स्वच्छता मॉनिटर' (Swachhata Monitor) अभियानाचे पैसे शिक्षण विभागाने थकवल्याचा दावा केला होता. यावरून त्याने पूर्वी उपोषणही केले होते. दुसरीकडे, शालेय शिक्षण विभागाने आर्य किंवा त्याच्या संस्थेशी कोणताही अधिकृत संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी सांगितले की, त्यांनी आर्यला वैयक्तिकरित्या मदत केली होती, परंतु सरकारी पैसे मिळवण्यासाठी योग्य कागदपत्रे सादर केली नव्हती. या संपूर्ण थरारक घटनेनंतर पोलिसांनी तपास गुन्हे शाखेकडे (Crime Branch) वर्ग केला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola