Mumbai High Court :परस्पर सहमतीनं शरीर संबंध ठेवल्यास फसवणूक नाही - मुंबई उच्च न्यायालय: Abp Majha

Continues below advertisement


परस्पर सहमतीनं शरीर संबंध ठेवल्यास फसवणूक नाही असा निकाल मुंबई उच्च न्यायालयानं एका सुनावणीदरम्यान दिला. तसेच सत्र न्यायालयाचा निकाल रद्द करत आरोपी प्रियकराची निर्दोष मुक्तताही केली आहे. पीडित महिलेच्या दाव्यानुसार तिचे पालघरमध्ये राहणाऱ्या व्यक्तीसोबत तीन वर्ष तिचे शारीरिक संबंध होते. सतत लग्नाचं खोटं आश्वासन देऊन प्रियकरानं शरीर संबंध ठेवल्यानंतर एकदिवस लग्नाला नकार दिला. फसवणुकीच्या आरोपाखाली 1999 रोजी अतिरिक्त सत्र न्यायालयानं  या प्रियकराला दोषी ठरवलं होतं. त्याविरोधात संबंधित व्यक्तीनं मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. तीन वर्ष नात्यामध्ये राहून शरीर संबंध ठेवल्यानंतर अचानक लग्नाला नकार दिल्यास त्याला फसवणूक म्हणता येणार नाही असं हायकोर्टानं म्हटलंय.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram