Mumbai Heavy Rain | मुंबईत मुसळधार पाऊस, उपनगरांमध्ये पाणी साचले
मुंबईमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईच्या पश्चिम आणि मध्य उपनगरांना पहाटेपासून पावसानं अक्षरशः झोडपून काढलं आहे. मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. मुंबईमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नोकरदार वर्गाचे हाल होण्याची शक्यता आहे. साकीनाका Metro परिसरातील रस्ते जलमय झाले आहेत. वाहन चालकांना पाण्यातून वाट काढताना अक्षरशः कसरत करावी लागत आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरांना पावसानं झोडपून काढले आहे आणि त्याचा परिणाम रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला असून नागरिकांना कामावर जाण्यासाठी अडचणी येत आहेत. पाणी साचल्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक संथ गतीने सुरू आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.