Mumbai-Goa Highway | गोवा हायवेवरचा नवा रस्ता खचला, उड्डाणपूल पूर्ण होण्यापूर्वी भिंत कोसळली
Continues below advertisement
तळकोकणात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या निकृष्ट दर्जाचे केलेल्या कामामुळे कणकवलीत सुरू असलेल्या उड्डाणपुलाची एका बाजूची भिंत कोसळली. मात्र यात कोणताही अनर्थ घडला नाही. एका बाजूने वाहतूक सुरू झाल्याने कणकवलीत वाहतूक कोंडी होत आहे. यावेळी आमदार नितेश राणे यांनी जाऊन पाहणी केली. मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणांच्या ठेकेदाराने कणकवलीची वाट लावलीय, अधिकारी-ठेकेदारांवर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी नितेश राणेंनी केली. यावेळी ते अधिकाऱ्यांशी बोलताना ठेकेदारावर कारवाई करा अन्यथा आम्ही याच रस्त्यासाठी अधिकाऱ्यांना जाब विचारला तर 302 सारखे गुन्हे दाखल करता त्यामुळे अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी अशी भूमिका घेतली.
Continues below advertisement