Mumbai First Underground Metro | मुंबईत 24 जुलैपासून पहिली भूमिगत मेट्रो सुरू होणार ABP Majha

Continues below advertisement

Mumbai- First Underground Metro | मुंबईत 24 जुलैपासून पहिली भूमिगत मेट्रो सुरू होणार ABP Majha

Mumbai Metro : मुंबई म्हटलं की, वाहतूक कोंडी... मुंबईकर सध्या वाहतूक कोंडीमं त्रस्त आहेत. अशातच ट्रॅफिक कमी करण्यासाठी उत्तम उपाय म्हणून सर्वजण मुंबईच्या पहिल्या भूमिगत मेट्रोची सर्वचजण आतुरतेनं वाट पाहत आहेत. आता यासंदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे. मुंबईची पहिली भूमिगत मेट्रो (ॲक्वा लाईन) 24 जुलैपासून सुरू होणार आहे.

भूमिगत मेट्रोचा 33.5 किमीचा भाग आरे कॉलनीपासून सुरू होतो. या मार्गावर तब्बल 27 स्थानकं असणार आहेत. भाजप नेते विनोद तावडे यांनी ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. 

मुंबईच्या या पहिल्या भूमिगत मेट्रो प्रकल्पात 33.5 किमी लांबीचा भुयारी मार्ग असेल. हा मार्ग आरे कॉलिनी येथून सुरू होईल. एकूण 27 स्थानकं असतील. त्यापैकी 26 स्थानकं भूमिगत असणार आहेत. या मेट्रो मार्गाचं काम 2017 मध्ये सुरू झालं होतं. मात्र, कोरोनामुळे हे काम बरेच दिवस रखडलं होतं. खोदकामातून एकूण 56 किलोमीटर लांबीचा रस्ता तयार करण्यात आला आहे. या मार्गावरील पहिला टप्पा आरे कॉलिनी ते बीकेसी (वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स) आहे. पहिला टप्पा 24 जुलैपासून सुरू करण्यात आली आहे.

मुंबईतील भूमिगत मेट्रो प्रकल्पांतर्गत कोणती स्थानकं आहेत? 

मुंबईतील भूमिगत मेट्रो प्रकल्पांतर्गत एकूण 27 स्थानकं असणार आहेत. 56 किलोमीटरपेक्षा जास्त लांब हा मार्ग आहे.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram