Diwakar Raote | उद्धव आणि राज ठाकरे यांनी आपलं वैयक्तिक संबंध जपले : दिवाकर रावते | ABP Majha
उद्धव ठाकरे यांच्या रुपाने महाराष्ट्राला आज (28 नोव्हेंबर) नवा मुख्यमंत्री मिळणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज संध्याकाळी 6 वाजून 40 मिनिटांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्यासाठी शिवतीर्थावर अर्थात शिवाजी पार्कवर जय्यत तयारी करण्यात आली आहे. ठाकरे घराण्यातली पहिलीच व्यक्ती मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार असल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साह आहे. शिवसेना आज याठिकाणी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंच्या शपथविधीसाठी राज्यभरातून शिवसैनिक मुंबईत दाखल झाले आहेत. याबाबत दिवाकर रावते यांनी एबीपी माझाशी बातचित केली.