Mumbai Cricket Association: MCA कार्यालयातील 15 जण कोरोनाबाधित ABP Majha

Continues below advertisement

मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि मुंबईतल्या बीसीसीआयच्या मुख्य कार्यालयातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. एमसीएच्या कार्यालयातील कर्मचारी, हाऊसकीपिंग आणि सुरक्षा रक्षक अशा मिळून १५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळं पुढील तीन दिवसांसाठी एमसीएचं कार्यालय बंद ठेवण्यात आलं आहे. एमसीएच्याच आवारात असलेल्या बीसीसीआयच्या कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार कार्यालयातले ९० टक्के कर्मचारी सध्या घरुनच काम करतात. काही मोजकेच कर्मचारी कार्यालयात येतात. त्यापैकी काहीजणांना हा संसर्ग झालाय. पण बीसीसीआयचं कार्यालय मात्र बंद ठेवण्याची कोणतीही योजना नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram