Mumbai : येत्या दहा दिवसांत ठाकरे सरकारचा कोविड सेंटर घोटाळा बाहेर काढणार : किरीट सोमय्या
Continues below advertisement
मुंबई : येत्या दहा दिवसांत ठाकरे सरकारचा कोविड सेंटर घोटाळा बाहेर काढणार असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. आर्थिक कमाईसाठी सत्ताधाऱ्यांकडून घाबरवण्याचं काम सुरू आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. किरीट सोमय्या म्हणाले की, मुंबईत कोरोनाचा रुग्णसंख्येचा आकडा जरी वाढला असला तरी कोविड सेंटर्स रिकामे पडले आहेत. बीकेसी मध्ये 2400 बेडपैकी 800 बेड्स वर रुग्ण अॅडमिट आहेत. दहिसरमध्ये 750 बेड्स आहेत पण अजून एक पण रुग्ण नाही. नेस्को गोरेगाव मध्ये 2000 बेड्सपैकी 900 रुग्णांनी बेड्स भरले आहेत. याचा अर्थ 98 टक्के रुग्ण आहे आपल्या घरी किंवा नर्सिंग होममध्ये बरे होतात. ज्यांचे लसीकरण झाले त्यातील 99.99 लोक हे सुरक्षित आहेत, असं सोमय्या म्हणाले.
Continues below advertisement