Mumbai corona positive : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा
Continues below advertisement
राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रात्री उशीरापर्यंत राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. मुख्य सचिवांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी आढावा बैठक घेतली होती. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठक बोलावली होती. यामध्ये त्यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह, मुख्य सचिव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सिताराम कुंटे, टास्क फोर्सचे सदस्य आणि आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी उपस्थित होते.
Continues below advertisement