Mumbai Corona: मुंबईत आज 20 हजार 318 नवे रुग्ण ABP Majha
Continues below advertisement
मुंबईत काल सलग दुसऱ्या दिवशी २० हजारांवर रुग्णांची नोंद झाली. मुंबईतील रुग्णसंख्यावाढ स्थिरावल्याचं चित्र असलं तरी लॅबवरील ताण आणि सेल्फ टेस्टमधील रुग्णांची न होणारी नोंद यामुळे प्रत्यक्षात काहीशी वेगळी परिस्थितीही असू शकते. त्यामुळे पुढचे काही दिवस काळजीचे असल्याचं वैद्यकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे. कारण उपचाराधीन रुग्णांच्या संख्या झपाट्यानं वाढत आहे. तसंच ऑक्सिजनची मागणीही वाढू लागलीय. याशिवाय औषधांची मागणीही वाढल्याचं औषध विक्रेते सांगतायत. त्यामुळे मुंबईकरांसाठी पुढचे काही दिवस काळजीचे आहेत. ओमायक्रॉनबाबत निष्काळजीपणा नको, त्याला गांभीर्यानं घ्या असं आवाहन वैद्यकीय तज्ज्ञ आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही केलं आहे.
Continues below advertisement