Mumbai Construction Accident | जोगेश्वरी पूर्व: बांधकाम साईटवर मुलांचा अपघात, एकाचा मृत्यू

जोगेश्वरी पूर्व येथील देवभूमि कन्स्ट्रक्शन साईटवर एक धक्कादायक घटना घडली आहे. रात्री बारा वाजण्याच्या सुमारास तीन लहान मुलं खेळण्याच्या नादात तिसऱ्या मजल्यावरून खाली पडली. या घटनेत एका मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर दोन मुलं गंभीररित्या जखमी झाली आहेत. ज्या इमारतीमध्ये ही घटना घडली, त्या इमारतीचं बांधकाम अजूनही सुरू आहे. जखमी मुलं त्याच इमारतीमध्ये राहणाऱ्या कामगारांची आहेत. जोगेश्वरी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे बांधकाम साईटवरील मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola