Mumbai तील सागरी प्रकल्पांचा मार्ग मोकळा, सागरी हद्द व्यवस्थापन आराखड्याला अखेर मंजुरी ABP Majha

मुंबई : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. मुंबई आणि मुंबई उपनगर क्षेत्रासाठी असलेल्या कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लान (सीझेडएमपी) आराखड्याला केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने अंतिम मंजुरी प्रदान केली आहे. याचा फायदा मुंबईतील प्रलंबित सागरी प्रकल्पांना होणार आहे. आता बांधकामाची मर्यादा 500 मीटरवरून थेट 50 मीटरपर्यंत कमी झाली आहे. याबद्दल माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांचे आभार मानले आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola