CM Uddhav Thackeray | पालघरमध्ये घडलेल्या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करू नका : उद्धव ठाकरे
Continues below advertisement
पालघरमध्ये घडला तो प्रकार निंदनीय आहे. परंतु त्यावरून सरकारवर आरोप करणे अयोग्य आहे. पालघर प्रकरणातील मुख्य आरोपी आज तुरूंगात आहे. पोलिसांसमोर हे हत्याकांड झाले हे खरं आहे. परंतु गैरसमजुतीने त्यांच्यावर हल्ला झाला आणि दुर्दैवाने त्यांची हत्या झाली. त्यामुळे या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करू नका असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
Continues below advertisement