Mumbai Fuel Hike : Petrol-Diesel दरवाढीला ब्रेक कधी लागणार? पाहा मुंबईकरांच्या संतप्त प्रतिक्रिया

Continues below advertisement

सरकारी तेल कंपन्यांनी आज पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel Price) किमतींमध्ये वाढ केली आहे. पेट्रोल आणि डिझेल दोन्हींचे दर 35 पैशांनी महागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये वाढ करण्यात येत आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशननं दिलेल्या माहितीनुसार, आजच्या दरवाढीनंतर दिल्लीमध्ये पेट्रोल 105.84 रुपये प्रति लिटरवर पोहोचलं आहे. तर डिझेलची किंमत आता 94.57 रुपये प्रति लिटरवर पोहोचली आहे. सलग महाग होणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram