CM Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेला संबोधित करणार, मोठ्या घोषणेची शक्यता
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी एक वाजता महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधणार आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री जनतेला संबोधित करणार आहेत. कोरोना आणि नववर्षाचं स्वागत यासोबतच नाताळ यासंदर्भात मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर काही नवी नियमावली जाहीर होणार का याकडे देखील सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.