Mumbai Central Railway | कूर्ला-सायन स्टेशनदरम्यान पाणी ओसरलं! मध्य रेल्वेची वाहूतक पुन्हा सुरू

Continues below advertisement

Mumbai Central Railway | कूर्ला-सायन स्टेशनदरम्यान पाणी ओसरलं! मध्य रेल्वेची वाहूतक पुन्हा सुरू 

नवी मुंबईत लोकल पकडताना महिला पाय घसरुन रुळांवर पडली; अंगावरून ट्रेन गेली, जीव वाचला पण दोन्ही पाय गमावले

मुंबई :  मुंबईत रात्रीपासून पावसाची (Mumbai Rain)  संततधार सुरू आहे. अनेक सखल भागात पाणी साचले आहे. पावसाचा लोकलवरही (Mumbai Local)   परिणाम झाला आहे. मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे रूळांवर पाणी साचल्याने ठप्प झाल्या आहेत. तर, पश्चिम रेल्वेही उशिराने धावत आहे. यामुळं प्रवाशांची तारांबळ उडाली आहे. रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली आहे. याच गर्दीमुळं एका महिला प्रवाशाचा गंभीर अपघात झाला आहे. या अपघातात तिला दोन्ही पाय गमवावे लागले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार,  पनवेलवरून ठाण्याकडे जाणारी लोकल सकाळी नऊच्या दरम्यान बेलापूर सीबीडी रेल्वे स्टेशन येताना एक महिला पाय घसरून रुळावर पडली. तिच्या अंगावर रेल्वेचा पहिला महिला डब्बा गेला. त्यामुळे प्रवाशी आणि रेल्वे प्रशासनाची तारांबळ उडाली. मात्र रेल्वे आणि पोलिस प्रशासनाने काही वेळात रेल्वे मागे घेऊन तिचा जीव वाचवला. पण महिलेचे दोन्ही पाय वाचू शकले नाही.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram