Central Railway Mumbai Local : मध्य रेल्वेच्या रोजच्या विलंबाविरोधात प्रवासी संघटना आक्रमक
Central Railway Mumbai Local : मध्य रेल्वेच्या रोजच्या विलंबाविरोधात प्रवासी संघटना आक्रमक
मध्य रेल्वेच्या लोकल रोज उशिरा असल्याने या प्रवासी संघटना एकत्रित येऊन आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाची सुरुवात आज दिवा येथे होणार आहे. तर 22 ऑगस्ट ला संपूर्ण मुंबईत अतिशय शांततापूर्वक प्रत्येक स्टेशनवर आंदोलन केले जाईल.
लोकलमधील गर्दीमुळे प्रवाशांना लोकलच्या दरवाजावर लटकून प्रवास करत लागत आहे. रोज ७ ते ९ रेल्वे प्रवाशांना आपला जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे लोकलच्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी लोकलच्या फेन्या वाढविण्याच्या मागणीसह इतर अनेक मागण्या रेल्वे प्रवासी संघाकडून करण्यात आल्या असून, २२ ऑगस्टला हाती घेण्यात आलेल्या मोहिमेत सहभागी होण्यासाठी खासदार, आमदार, सार्वजनिक मंडळ, सोसायटी गोविंदा पथक, सामाजिक कार्यकर्ते यांना आवाहन करण्यात आले आहे. रेल्वे प्रशासनाचा निषेध म्हणून रेल्वे प्रवासी संघटनांनी २२ ऑगस्ट रोजी मोहीम हाती घेण्यात आली आहे. या दिवशी रेल्वे प्रवाशांनी पांढरे कपडे घालून रेल्वे प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. आपल्या पाठिंब्याशिवाय हा लढा अशक्य आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. सगळ्यात जास्त कर संकलन मुंबईकरांकडून केले जाते. तरीसुद्धा रोज ७-९ मुंबईकरांचे प्राण रेल्वे ट्रॅकवर जातात. त्यामुळे या प्रश्नाकडे लक्ष देण्यासाठी हे अहिंसक सत्याग्रह आंदोलन हाती घेण्यात आले आहे. २२ ऑगस्टला सफेद कपडे घालून, काळी रिबीन/मास्क लावून रेल्वेने प्रवास करा. जर तुम्ही प्रवासी नसाल तर सकाळी ७ वाजता तुमच्या नजीकच्या स्टेशनवर भेट द्या. मागण्यांचे निवेदन स्टेशन मास्तरला देऊन त्याचा फोटो सोशल मीडियाला #WYW (Wear Your White) हॅशटॅग सकट अपलोड करा, असे आवाहन करण्यात आले आहे.