Mumbai Cash Seized : विधानसभेच्या रणधुमाळीआधी पैशाचा बाजार, मुंबईतून रोकड जप्त
Mumbai Cash Seized : विधानसभेच्या रणधुमाळीआधी पैशाचा बाजार, मुंबईतून रोकड जप्त
निवडणुकीमुळे अनेक ठिकाणी लावलेल्या पोलीस बंदोबस्तात करोडो रूपयांची माया पकडली जावू लागली आहे. मात्र हे पैसे आडवू नका , राजकीय नेत्यांनी भ्रष्टाचारातून करोडो रूपये कमविले असून लोकांचा पैसा लोकापर्यंत पोचू द्या अशी वादग्रस्त मागणी रायगड कॅाग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी केली आहे. उरण मतदार संघात पैसाचा पैवूस पडणार असल्याचा दावाही त्यांनी केलाय. रायगड जिल्ह्यात महाविकास आघाडीत शेकाप उमेदवाराला पाठिंबा द्यायचा कि ठाकरे गटाला या अडचणीत कॅाग्रेस सापडली आहे.
हे ही वाचा..
"लाडकी बहिणी योजनेचे पंधराशे रुपये घेणाऱ्या महिला काँग्रेसच्या रॅली दिसल्या तर त्यांचे फोटो काढून घ्या, नावं लिहून घ्या. कारण घ्यायचं आपल्या शासनाचे आणि गायचं त्यांचं असं चालणार नाही. अनेक ताया आहेत, महाराष्ट्रात छाती बडवत आहेत. आम्हाला पैसे नको आम्हाला सुरक्षा पाहिजे म्हणत आहेत", असं वादग्रस्त वक्तव्य भाजपचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी केले आहे. ते कोल्हापुरातील प्रचार सभेत बोलत होते.
धनंजय महाडिक म्हणाले, काँग्रेसच्या सभेला जर महिला दिसल्या तर जाऊन फोटो काढायचे. फोटो आमच्याकडे द्या, त्यांची व्यवस्था करतो. कोण लय बोलायला लागली किंवा दारात आली तर तिला फॉर्म द्यायचा आणि यावर सही कर म्हणायचे आम्ही पैसे लगेच बंद करतो, असा इशाराही धनंजय महाडिक यांनी दिलाय. राजकारण करत आहात या पैशांचं? काँग्रेसच्या सभेत महिला दिसल्या जाऊन फोटो काढायचे. काँग्रेसच्या रॅलीत महिला दिसल्या जाऊन फोटो काढायचे. आमच्याकडे फोटो द्या, आम्ही त्यांची व्यवस्था करतो. लय मोठ्याने कोण भाषण करु लागली, किंवा दारात आली तर लगेच फॉर्म देऊन सही घ्यायची आणि पैसे बंद करुन टाकायचे. आमच्याकडे काय पैसे लय झालेले नाहीत. आम्ही दुसऱ्या गरिब महिलेला देऊ आम्ही, पण असा दुगलेपणा येथून पुढे चालणार नाही. त्यामुळे आपण जागृत राहिलं पाहिजे, असंही महाडिक म्हणाले.