CAA NRC Protest | सीएए-एनआरसीविरोधात 65 संघटनांचा मोर्चा, महाराष्ट्र विकास आघाडीचे मंत्रीही सहभागी
सीएए, एनआरसी आणि एनआरपी कायद्याविरोधात आज 65 संघटना एकत्र येऊन मोर्चा काढणार आहेत. मुंबईतील आझाद मैदान हा मोर्चा येणार आहे. केंद्र सरकारविरोधात हा महामोर्चा असल्याचं आंदोलकांनी सांगितलं आहे. संविधान बचाव भारत बचाव असा नारा आंदोलकांनी दिला आहे. या महामोर्चात महाराष्ट्र विकास आघाडीतील नेते बाळासाहेब थोरात, नितीन राऊत, अबू आझमी, नंदिता दास, निवृत्त न्यायाधीश कोळसे पाटील, अनुभव सिन्हा, जावेद जाफरी, सुशांत सिंह, शाहियार अन्सारी यांच्यासह दिग्गज सहभाग नोंदवणार आहेत.