Digital Arrest : 'ED-CBI अधिकारी आहोत', मुंबईत उद्योजकाला 58 कोटींना गंडा, तिघांना अटक

Continues below advertisement
मुंबई आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सायबर गुन्हेगारांनी तीन मोठ्या घटनांमध्ये नागरिकांना कोट्यवधी रुपयांना गंडवले आहे. मुंबईत एका उद्योजकाला आणि त्याच्या पत्नीला 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली तब्बल ५८ कोटींना लुटण्यात आले. आरोपींनी 'ईडी आणि सीबीआयचे अधिकारी असल्याची बतावणी करून पैसे लुटल्याचे' समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी अब्दुल नासिर खुल्ली, अर्जुन कडवासरा आणि जेठाराम कडवासरा या तिघांना अटक केली आहे. दुसऱ्या घटनेत, दक्षिण मुंबईतील एका ज्येष्ठ नागरिकाने डॉक्टरच्या अपॉइंटमेंटसाठी ॲप डाउनलोड करून १७ लाख रुपये गमावले. तर, छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योगपती अझीम प्रेमजी यांच्या नावाने बनावट गुंतवणूक ॲप तयार करून एका उद्योजकाला ७६ लाखांचा गंडा घालण्यात आला. या फसवणुकीची रक्कम बीडमधील बँक खात्यांमध्ये हस्तांतरित झाल्याने महाराष्ट्रात सायबर गुन्हेगारीचे जाळे पसरल्याचे स्पष्ट झाले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola