Digital Arrest: 'ED-CBI अधिकारी आहोत', मुंबईच्या उद्योजकाला आणि पत्नीला तब्बल ५८ कोटींना गंडवलं

Continues below advertisement
मुंबईमध्ये (Mumbai) 'डिजिटल अरेस्ट'च्या (Digital Arrest) माध्यमातून एका उद्योजकाची तब्बल ५८ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांनी (Cyber Police) अब्दुल नासिर फुल्ली, अर्जुन आणि जेठा अशा तीन आरोपींना अटक केली आहे. भामट्यांनी 'आम्ही ED आणि CBI चे अधिकारी आहोत, तुम्ही Money Laundering प्रकरणामध्ये अडकला आहात', अशी बतावणी करून नऊ ऑगस्ट ते आठ ऑक्टोबर दरम्यान व्यावसायिकाला धमकावले. भीतीपोटी पीडित उद्योजकाने आणि त्याच्या पत्नीने RTGS द्वारे ५८ कोटी १३ लाख रुपये आरोपींच्या १८ वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर केले. 'डिजिटल अरेस्ट' ही कायदेशीर अटक नसून फसवणुकीची एक पद्धत आहे, ज्यामध्ये भामटे व्हिडिओ कॉलद्वारे लोकांना धमकावून आणि एकटे पाडून पैसे उकळतात. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola