Mumbai : atal bihari vajpayeeयांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाला राज्य सरकारनं परवानगी नाकारली
भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या कांदिवली येथील पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाला राज्य सरकारनं परवानगी नाकारलीय. खासदार गोपाळ शेट्टी यांच्या पुढाकारानं हा पुतळा उभारण्यात आला होता. आज अटलजींची जयंती आणि आजच्या दिवशीच भाजपाध्यक्ष जे पी नड्डा आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अटलजींच्या पुतळ्याचं अनावरण होणार होतं. मात्र ओमायक्रॉन संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं या कार्यक्रमाला परवानगी नाकारली . त्यामुळेच जे पी नड्डा यांचा नियोजित मुंबई दौराही रद्द करावा लागला. त्यामुळे खासदार गोपाळ शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केलीये. मत्र या पुतळ्याच्या अनावरणासोबत आयोजित अटल महोत्सव मात्र ठरल्याप्रमाे होणार असल्याचं ते म्हणाले आहेत.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Marathi News