Ashok Chavan | सुधीर मुनगंटीवारांचं वक्तव्य म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने : अशोक चव्हाण | ABP Majha

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचं महाराष्ट्र विकास आघाडी सरकार स्थापन होऊन आता दोन महिने उलटले तरीही भाजप पुन्हा सत्तेत येण्याबाबत आशावादी असल्याचं चित्र आहे. शिवसेनेने प्रस्ताव दिल्यास भाजप आजही सत्तास्थापनेसाठी तयार आहे, असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. नांदेडमध्ये एका विवाहसोहळ्याला माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते, त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola