Mumbai Airport Shut Rain : मुंबईला तुफान पावसानं झोडपलं, विमानतळाचे सगळे रनवे बंद

Continues below advertisement

मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी वादळी पावसाला सुरूवात झाली असून मुंबई आणि नवी मुंबईतही जोरदार वाऱ्यासह पाऊस (Mumbai Rain Update) पडत आहे. मुंबई उपनगरातील विक्रोळी, भांडूप आणि मुलुंडूमध्ये मोठा पाऊस पडत असून रस्त्यांच्या कडेला पाण्याचा लोट असल्याचं दिसतंय. तर अचानक आलेल्या या पावसामुळे वाहतूक व्यवस्था काहीशी मंदगतीने सुरू आहे. तर घाटकोपर ते वर्सोवाची मेट्रो व्यवस्थाही ठप्प झाल्याची माहिती आहे. 

गेल्या काही दिवसांपासून उष्णतेमुळे मुंबईकर हैराण झाले होते. आजच्या पावसामुळे त्यांना काहीसा दिलासा मिळाल्याचं दिसतंय. मुंबईतील पूर्व आणि पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. पूर्व उपनगरात, विक्रोळी, भांडूप मुलुंडमध्ये मोठा पाऊस सुरू असल्याने वाहनं ही हळूहळू पुढे सरकत आहेत. घाटकोपरमध्ये मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जॅम झालं आहे. इतरही अनेक ठिकाणी हीच स्थिती असल्याची माहिती आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram