Prajakta Mali | प्राजक्ताकडून ड्रेस डिझायनरला कथित मारहाण प्रकरण: सुनावणीला स्टे असल्याचा वकिलांचा दावा | ABP Majha

आपल्याच ड्रेस डिझायनरला कथित मारहाण केल्याप्रकरणी मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीला कोर्टात हजर न राहिल्याबद्दल जामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. तसंच प्राजक्ता माळी यांना यापूर्वीच्या सुनावणीत एक हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. या निर्देशानंतरही त्या कोर्टातही हजर राहिल्या नाही तर त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरन्ट काढण्याच्या सूचनाही न्यायालयाने दिल्या आहेत. मात्र अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचे वकील अॅड. प्रताप परदेशी यांनी कनिष्ठ न्यायालयातील या सुनावणीला जुलै महिन्यातच ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने स्थगिती दिल्याचा दावा केला आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola