Mumbai : विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका आक्रमक, सावित्रीबाईंचा मास्क घालून आंदोलन

Continues below advertisement

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीनं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या दिवशी आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबईतल्या आझाद मैदानात धरणं आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात सावित्रीबाई फुले यांचा मुखवटा घालून राज्यभरातील अंगणवाडी सेविका एकत्र आल्या होत्या. राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा आणि वेतन द्यावं, अर्ध्या पगाराऐवजी दरमहा पेन्शन मिळावी, तसंच नवीन कार्यक्षम मोबाईल आणि राजभाषेत पोषण ट्रॅक ॲप द्यावं, तसंच बालकांच्या पूरक पोषण आहारात दुपटीनं वाढ करून चांगल्या प्रतीचा आहार द्यावा, या मुख्य मागण्या आंदोलनात करण्यात आल्या आहेत. सेवानिवृत्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्वरित एकरकमी लाभ द्यावा आणि सुसज्ज अंगणवाडी केंद्र बांधून द्यावं या रखडलेल्या मागण्याही या आंदोलनात मांडण्यात आल्या

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram