Crime News | बालअत्याचाराच्या घटनांनी महाराष्ट्र हादरला; नागपूर, बीड, नाशिक, जालन्यात अत्याचाराच्या घटना | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
संपूर्ण देश हैदराबाद महिला पशु वैद्य सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे हादरून गेला असतानाच महाराष्ट्रातही बलात्काराच्या घटना समोर आल्या आहेत. अजून देशभरात हैदराबाद बलात्कार प्रकरणाच्या विदारक आठवणी ताज्या आहेत. अशातच महाराष्ट्रातील अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. नागपुरात 5 वर्षीय चिमुकलीवर अत्याचाराचे प्रयत्न करण्यात आला असून दगडाने ठेचलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला, तर नाशिक, बीड, जालन्यातही अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत.