ST Buses Police Protection : पोलीस संरक्षणात धुळे आगारातून बसेस रवाना

ST Worker Strike: गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात एस टी चा विषय अत्यंत ज्वलंत बनलेला अखंड महाराष्ट्राने पाहिलाय. एस टी कर्मचाऱ्यांच्या आंदेलनाने राजकारण गेल्या काही दिवसात प्रचंड तापलं आणि आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी सत्ताधाऱ्यांकडून आणि विरोधकांकडून एकमेकांवर झाडल्या गेल्या. एस टी च्या विलनीकरणाच्या मुद्दयावर अद्याप काहीच तोडगा निघाला नाही. त्या संदर्भात गेल्या एक दोन दिवसांपासून बैठकांचं सत्र देखील सुरु झालंय. मात्र आता हे वातावरण आणखी चिघळण्याची चित्र आहेत. कारण त्यासंदर्भात एक नवीन अपडेट समोर येतेय. हा संप संपूर्ण महाराष्ट्रात काटोकोरपणे पाळला गेला असला तरी, या पवित्र्याचा विरोधाभास आज पहायला मिळाला. धुळे आगारातून आज पहिली बस बाहेर निघाली. संप असून देखील आणि एस टी कर्मचाऱ्यांचा लढा अद्याप संपलेला नसताना देखील धुळ्यात हा पवित्रा घेण्यात आला आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola