MSRTC System Down: 'नवीन प्रणाली किचकट, सोयीस्कर नाही', ऐन दिवाळीत ST प्रवाशांचे हाल

Continues below advertisement
एसटी महामंडळाची (MSRTC) आरक्षण प्रणाली ऐन दिवाळीच्या (Diwali) सिझनमध्ये ठप्प झाल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. 'सदर प्रणाली ही सोयीस्कर होण्याऐवजी जास्तच किचकट आहे,' असं प्रवाशांचं म्हणणं आहे. महामंडळाने दोन वर्षांपूर्वीच जुनी प्रणाली बदलून नवीन सॉफ्टवेअर आणि कंपनी आणली होती, मात्र ही नवीन प्रणालीच आता डोकेदुखी ठरत आहे. या प्रणालीमुळे केवळ प्रवाशांनाच नाही, तर कर्मचाऱ्यांनाही नाहक त्रास होत आहे. आधी एका गाडीसाठी आरक्षण मेमो प्रिंट काढायला एक कागद लागत होता, पण आता त्याच कामासाठी तीन कागद लागत आहेत. यामुळे वेळेचा आणि संसाधनांचा अपव्यय होत असून, ऐन सणासुदीच्या काळात महामंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola