Coronavirus | राज्यातील प्रत्येक डेपोतील काही एसटी कर्मचाऱ्यांना मुंबईत हजर होण्याचे आदेश
एसटी महामंडळाने कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात एक नवा आदेश काढला आहे. या निर्णयामुळे एसटी कर्मचारी नाराज आहेत. राज्यभरातील प्रत्येक डेपो मधील काही एसटी कर्मचाऱ्यांना मुंबईत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर अनेक जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी हजर होण्यास नकार दिला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेसाठी एसटी कर्मचाऱ्यांना मुंबईत बोलावले असल्याची माहिती आहे.