ST Bus Digital Tickets : एसटीतून होणार कॅशलेस प्रवास, डिजिटल प्रणालीद्वारे मिळणार तिकीट ABP MAJHA
एसटी महामंडळानं एक पाऊल पुढे टाकत 'डिजिटल' प्रणालीद्वारे तिकिट खरेदीसाठी आता ऑनलाीन सुविधा दाखल केल्या आहेत. तसंच अशा सर्व वाहकांसाठी ॲण्ड्राईड तिकिट इश्यू मशिन्स एसटी महामंडळाकडून आणण्यात आल्या आहेत. तसंच नव्या मशिनमुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान रोख पैशांऐवजी युपीआय, क्युआर कोड, आदी डिजिटल पेमेंटचा वापर करत तिकिट काढता येणार आहे. प्रवाशांना होणारा त्रास यानंतर होणार नाहीय.