BHANDARA CONDUCTOR VIRAL VIDEO: लाखनी बस स्थानकात महिला वाहकाची विद्यार्थिनीला बेदम मारहाण!

Continues below advertisement
भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील लाखनी (Lakhani) बस स्थानकावर एसटी महामंडळाच्या (MSRTC) महिला वाहकाने एका विद्यार्थिनीला (Student) बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिला वाहक आणि विद्यार्थिनीमध्ये झालेल्या वादानंतर वाहकाने मारहाण केल्याची माहिती आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला असून, या प्रकारानंतर प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. मात्र, हा वाद नेमका कशामुळे सुरू झाला, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या व्हायरल व्हिडिओमुळे (Viral Video) एसटी महामंडळाच्या कारभारावर आणि कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola