MSP Crisis: 'खाजगी बाजारात ३८००, सरकारचे ५३२८', Amravati त सोयाबीनसाठी शेतकऱ्यांची झुंबड
Continues below advertisement
अमरावती (Amravati) जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर (Nandgaon Khandeshwar) येथे सोयाबीनच्या (Soybean) शासकीय खरेदीसाठी NAFED च्या नोंदणीला सुरुवात होताच शेतकऱ्यांची मोठी गर्दी उसळली आहे. सोयाबीनचा शासकीय दर प्रति क्विंटल ₹5,328 असताना, खाजगी बाजारात केवळ ₹3,800 ते ₹4,000 भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी शासकीय खरेदी केंद्रांकडे धाव घेतली आहे. अनेक शेतकरी नोंदणीसाठी आदल्या रात्रीपासूनच रांगेत उभे असल्याचे चित्र आहे. खाजगी बाजारातील घसरलेले दर आणि शासनाने जाहीर केलेल्या आधारभूत किंमतीतील मोठ्या तफावतीमुळे शेतकरी हवालदिल झाला असून, शासकीय खरेदी हाच त्यांना एकमेव आशेचा किरण वाटत आहे. केंद्र सरकारने नुकतीच महाराष्ट्रातून १८ लाख ५० हजार टन सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे, त्यामुळे नोंदणीसाठी शेतकऱ्यांची गर्दी वाढली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement