Rohit Pawar Bank Scam : शिखर बँक घोटाळा प्रकरणात रोहित पवार यांना दिलासा
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (Maharashtra State Cooperative Bank) अर्थात शिखर बँक (Shikhar Bank) घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. MP MLA कोर्टाने (MP MLA Court) रोहित पवार यांची वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका केली आहे. शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी झालेल्या सुनावणीनंतर कोर्टाने हा निर्णय दिला. या निर्णयामुळे आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात पवार यांना वैयक्तिक जामिनावर (Personal Bond) कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. पवार यांची पीआर बॉन्डवर (PR Bond) सुटका करण्यात आल्याची ही एक महत्त्वाची अपडेट आहे.