MPSC Rajyaseva Exam Pattern : एमपीएससीच्या परीक्षा पद्धतीमध्ये बदल करण्याचा निर्णय, काय आहे बदल?
एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी. एमपीएससीच्या परीक्षा पद्धतीमध्ये बदल करण्याचा निर्णय़ घेण्यात आला आहे. 'गट अ ते गट क'च्या भरतीसाठी आता दोनच संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहेत. एमपीएससी मार्फत शासन सेवेतील विविध पदांकरिता राबविण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेमुळे परीक्षांची संख्या वाढली आहे. त्यामुळे उमेदवार आणि प्रशासकीय यंत्रणेवर ताण येतो, तसंच भरती प्रक्रियेत विलंब होतो. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.