MPSC EXAM : वयोमर्यादा ओलांडलेल्या 'त्या' उमेदवारांना संधी ABP Majha

एमपीएससी परिक्षार्थींसाठी एक आनंदाची बातमीये. नोकरभरतीसाठी वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना स्पर्धा परीक्षा देता येत नसल्याने वयोमर्यादा वाढवण्याची मागणी होत होती. त्याबाबतचा निर्णय घेतल्यानंतर आता एमपीएससी साठी एक वाढीव संधी देण्याचाही निर्णय राज्य सरकारने घेतलाय. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता अंमलात असल्याने याबद्दलचा जीआर १० ते १५ डिसेंबरदरम्यान काढण्यात येईल.  कोविडमुळे गेल्या दोन वर्षापासून एमपीएससी आणि सरळसेवेच्या भरती प्रक्रिया होऊ शकल्या नव्हत्या त्या पाऱ्श्वभूमीवर हा निर्णय महत्वाचा आहे. 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola