Maratha Reservation : खासदार संभाजीराजे छत्रपती आज कोपर्डी दौऱ्यावर
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याने हा मुद्दा चांगलाच तापला आहे. आरक्षणासाठीच्या आंदोलनात खासदार संभाजीराजे छत्रपती सक्रिय झाले आहेत. यासाठी संभाजीराजे राज्यातील सर्व मराठा नेते आणि पदाधिकारी यांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यातच संभाजीराजे आज अहमदनगरमधील कोपर्डीचा दौरा करणार आहेत. कोपर्डी बलात्कारातील पीडितेच्या कुटुंबाची भेट घेऊन स्मृतिस्थळावरही जाणार आहेत. कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर तिला न्याय मिळवून देण्यासाठी आणि मराठा समाजाच्या इतर मागण्यांसाठी आंदोलनाला सुरुवात झाली होती.