MP Sambhaji Raje : 3 मे नंतर आपली दिशी वेगळी असेल : खासदार संभाजीराजे छत्रपती
तीन मेनंतर आपली दिशा वेगळी असेल असं वक्तव्य खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केलंय. ३ मे रोजी संभाजीराजेंची राज्यसभा खासदारकीची मुदत संपतेय. ३ मे नंतर राजकीय दिशा स्पष्ट करणार असल्याचं संभाजीराजेंनी सांगितलंय. त्यामुळे संभाजीराजेंच्या वक्तव्याचे निरनिराळे अर्थ काढले जाऊ लागलेत. राज्यसभा खासदारकीचा कार्यकाळ संपल्यावर संभाजीराजे भाजपत प्रवेश करणार, शिवसेना-राष्ट्रवादीकडे जाणार की आपला नवा पक्ष स्थापन करणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचलीय.